Contact Banner

राजगृहवर हल्ला करणार्यांना अटक करा -फैजपूर एकता फाउंडेशन तर्फे प्रांतधिकारी,व पोलीस निरीषक यांना निवेदन


एकता फाउंडेशन फैजपूर तर्फे प्रांतधिकारी व पोलीस निरीषक फैजपूर यांना निवेदन     

     
 
                                                                                  फैजपुर( प्रतिनिधी ) मुंबई येथे दादार मुंबई येथे स्थितः राजगृह  या भारत रत्न डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानावर काल दिनांक:07/07/2020 रोजी समाजकांटनी भ्याड हल्ला करून तेथील सी.सी टी व्ही केमेरे व झाडांच्या कुंड्या व खिद्याची तावदाने याची तोडफोड केलेली आहे. डॉ. बाबा साहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावर आधन्ह्यात व्यक्तीने हल्ला करून विकृत मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. सदर कृत्य हे अत्यंत निषेधाह्र आहे व त्यामुळे समस्त आंबेडकरवादी जनतेत संतापाची लाट उसळली आहे.                तरी सदर हल्ला करणाऱ्या माथेफिरूला तात्काळ अटक करून या ह्ल्यामागे असलेल्या विकृत मेंदूचा सुद्धा तपास लावावा व आरोपीवर एतिहासिक वस्तूची तोडाफोड, दंगल, समाजात दुफळी माजवण्याच्या प्रयत्न. अट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हे दाखल करून तातडीने अटक करून शिक्षा होण्याच्या दुष्टीने कार्यवाही करावी. अशी मागणी एकता फौंडेशन व जमात ए  इस्लामी हिंद शाखा फैजपूर च्या वतीने करण्यात येत आहे. निवेदन देताना एकता फाऊनडेशन  अध्यक्ष शेख इरफान व उप.अध्यक्ष अजय मेढे व सचिव मुदस्सर शेख व शेख.आसिफ घनेशशाम चंदन शिव भूषण मेढे मोहसीन शेख मुजाहिद नासीर, मोहसीन शब्बीर शेख, शेख इस्माईल मुजाहिद गफ्फार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.