Contact Banner

सावद्यात दोन पॉझिटिव्ह ५४ वर्षीय कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू !तर गांधी चौकातील ६६वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह


सावद्यात दोन पॉझिटिव्ह  ५४ वर्षीय कोरोना बाधित  रुग्णांचा मृत्यू !तर गांधी चौकातील ६६वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह

आज पर्यंत पॉझिटिव्ह ५१
  सावदा (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सावदा शहरातही सुरवतीला कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला होता. मात्र दिलासादायक बाब बऱ्याच दिवसांपासून शहरात बाधित रुग्ण आढळून आला नव्हता परंतु आज  दि ; ५ रोजी आलेल्या माहिती नुसार आज सकाळी पुन्हा  इलेक्ट्रॉनिक दुकान चालक ५४ वर्षीय पुरुषाचा खाजगी अहवाल बाधित आला  होता नंतर सदरील बाधित रुग्ण ९ ;५० वाजेच्या सुमारास गोदावरी कोविड सेंटरमध्ये उपचार दरम्यान  मृत्यू पावल्याने शहरात व  परिसरात चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे.या बाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . कारण गत  आठववड्यात याच कुटूंबातील ५६ वर्षीय  पुरुषांचा याच कोविड सेंटरला मृत्यू झाला होता . सदरील रुग्ण धान्य मार्केट परिसरातील निमजाय माता नगर येथील रहिवासी आहे. 
      आज  दि ५ रोजी दुपारी आलेल्या अहवालात गांधी चौक परिसरातील इलेक्ट्रिक दुकानदार ६६ वर्षीय पुरुष  पॉझिटिव्ह आल्याने आज पर्यंत रुग्ण संख्या ५१ झाली आहे  सदरील घटना घडल्याने परिसरात चिंता पसरली आहे तर संपर्कातील २५ व्यक्तींना कॉरंटाइन केले गेले आहे. तर परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या फिफ्टी झाली
असुन त्यात ९मयत, ९ जण उपचार घेत आहेत व बाकी सर्व ३३व्यक्ती कोरोनाला मात देत घरी परतले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.