तुम्हाला सक्सेसफुल व्हायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा
तुम्हाला सक्सेसफुल व्हायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा
आज पासुन बुक समरी साठी सुरुवात करत आहे.
आजचे बुक आहे The secret - By Rhonda Byrne यांनी लीहीलेलं हे पुस्तक आहे.
या पुस्तकात लॅा ॲाफ ॲक्ट्रॅक्शन या निसर्गाच्या नियमा बद्दल सांगितले आहे .
जर तुम्हाला खरोखर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्वता:हावर विश्वास ठेवला पाहीजे. तसेच या ब्रम्हांडावर देखील विश्वास ठेवला पाहीजे. कारण आपण जे वर्तमानात बोलतो, तेव्हा ते ब्रम्हाडापर्यंत पोहोचते व तिथून ते आपल्या पर्यंत परत येते. म्हणजे चुंबक जसे लोखंडाला आकर्षित करते तसेच आपले विचार ब्रम्हांडात आकर्षित होतात व ते परत आपल्या कडे येतात. मी जे देतो ते माझ्या कडे परत येतं . मला सक्सेस व्हायचंय च्या ऐवजी मी सक्सेसफुल आहे . मी बरी होईन च्या ऐवजी , माझे आरोग्य सुदृढ आहे. मी श्रीमंत आहे असे वाक्य वापरले पाहीजे. जशी आपली दृष्टी तशी सुष्टी असं म्हटलं जातं. आपला प्रत्येक विचार एक शक्ती आहे. आपल्या जिवनात जेणे येतं ते आपणच आकर्षित करत असतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टींचा सतत विचार करतो तेव्हा त्या गोष्टींचे कल्पना चित्र आपल्या मनांत निर्माण करतो तेव्हा ते आपण ब्रम्हांडात पाठवत असतो व ते आपल्या कडे परत येते.
या ठीकाणी बरेच जण म्हणतात की मी खुप पॅाझीटिव्ह आहे, पण माझ्या बाबतीत काहीच योग्य घडत नाही, तर तुमची विचार करायची पद्धत चुकीची आहे. ऊदा. बरेच लोक म्हणतात की कीतीही कमवा पैसा पुरत नाही, महागाई खुप वाढली आहे, तर याएवजी तुम्ही असं म्हणा की, माझ्याकडे भरपुर पैसा आहे तो माझ्या गर्जा पुर्ण करुन ऊरतो. पैसा मला आवडतो, पैसा माझ्या कडे आकर्षित होतो, माझा बॅंक बॅलन्स पुरेसा आहे. मला बरे नाही, माझे डोके दुखते, याऐवजी माझी तब्बेत चांगली आहे मी सुदृढ आहे. बर्याच आई आपल्या मुलांना हा जेवत नाही, अभ्यास करत नाही अस म्हणतात पण हे चुक आहे याठिकाणी माझा मुलगा जेवतो, अभ्यास करतो अस म्हणा.
तुम्हीकोणताही विचार निट विचार करुन करा, की जेणे करुन तो निगेटीव्ह नाही ना हे पाहा. जेव्हा तुम्ही योग्यरीतीने विचार करायला वअनुभव घ्यायला लागतात तेव्हा सुदृढ शरीर व मनाची शांती अपरिहार्य पणे प्राप्त होते. एकदा का हे रहस्य तुम्ही समज़ुन घेतलं की, तुम्ही हवे ते मिळवु शकता, बनु शकता, करु शकता, तुम्हाला तुमच्या व्यापकतेची खर्या शक्तीची जाणिव होईल, आणि त्या वैभवाची देखील. ज्याची तुम्ही वाट पाहात आहात. तर मित्रांनो नेहमी पॅाझीटिव राहा, व यशस्वी व्हा.
शब्दांकन
सरोज सरोदे सावदा ,ह.मु नवी मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत