विद्यार्थी वाचवा मोर्चाच्या रावेर तालुका प्रमुख पदी प्रेम चौधरी तर उपतालुका प्रमुख पदी कुणाल माळी
प्रेम चौधरी कुणाल माळी
प्रतिनिधी सावदा-
विद्यार्थी वाचवा मोर्चा ही एक अराजकीय संघटना महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आली असून संघटनेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली,यात संघटना महाराष्ट्र राज्यात विद्यार्थी हिताचे काम करणार असून कार्य करीत राहील.
संघटनेच्या रावेर तालुका कार्यकारणी हे अक्षय बोरोले जिल्हाप्रमुख व रितेश भारंबे जळगाव जिल्हा सरचिटणीस यांचे नेतृत्वा खाली व प्रेम चौधरी रावेर तालुका प्रमुख यांच्या संमतीने जाहीर करण्यात आली व निवड करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली खान्देश मधील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे पदाधिकारी खंबीर आहेत असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. विद्यार्थ्यांच्या बाजूने अडचणी च्या वेळी नेहमीच उभे राहू असा विश्वास दर्शविला आहे.
रावेर तालुका सम्पर्क प्रमुख (ग्रामीण) पदी आकाश महाजन यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष प्रेम रविंद्र चौधरी रोझोदा,
उपाध्यक्ष कुणाल राजेंद्र माळी,सावदा,
सरचिटणीस विपूल गलवाडे खिर्डी
संघटक निलेश बाक्षे कळमोदा
सचिव महेश पाटील गहूखेडे
कोषाध्यक्ष ऋतिक अकोले रावेर
कार्याध्यक्ष प्रतिक नारखेडे खिरोदा
अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहेत.
विद्यार्थी प्रश्नांचे राजकीय पक्ष राजकारण करत असतानाच या अराजकीय चळवळीने नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होईल.सर्व जिल्ह्यात राजकीय व विद्यार्थी संघटनाकडून रावेर तालुका कार्यकारणी यांचे तालुक्यात अभिनंदन होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत