विद्यार्थी वाचवा मोर्चाच्या यावल तालुका प्रमुख पदी हर्षल गाजरे हिंगोणा, तर सरचीटणिस पदी अक्षय परतने भालोद.
विद्यार्थी वाचवा मोर्चाच्या यावल तालुका प्रमुख पदी हर्षल गाजरे हिंगोणा, तर सरचीटणिस पदी अक्षय परतने भालोद.
यावल ता.अध्यक्ष यावल ता.सरचीटणीस
प्रतिनिधी सावदा-
विद्यार्थी वाचवा मोर्चा ही एक अराजकीय संघटना महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आली असून संघटनेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली,यात संघटना महाराष्ट्र राज्यात विद्यार्थी हिताचे काम करणार असून कार्य करीत राहील.
संघटनेच्या यावल तालुका कार्यकारणी हे अक्षय बोरोले जिल्हाप्रमुख व रितेश भारंबे जळगाव जिल्हा सरचिटणीस यांचे नेतृत्वाखाली व हर्षल गाजरे तालुका प्रमुख यांच्या संमतीने जाहीर करण्यात आली व निवड करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली खान्देश मधील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे पदाधिकारी खंबीर आहेत असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या बाजूने अडचणी च्या वेळी नेहमीच उभे राहू असा विश्वास दर्शविला आहे.
अध्यक्ष हर्षल गाजरे हिंगोणा,
उपाध्यक्ष स्नेहल फिरके यावल,
सरचिटणीस अक्षय परतणे भालोद,
संघटक मयूर सोनवणे हिंगोणा,
सचिव संजीदा बडगुजर यावल,
कोषाध्यक्ष निखिल जावळे फैजपूर,
कार्याध्यक्ष हेमंत भंगाळे फैजपूर,
संपर्क प्रमुख वासु भंगाळे सांगवी,
अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहेत.
विद्यार्थी प्रश्नांचे राजकीय पक्ष राजकारण करत असतानाच या अराजकीय चळवळीने नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होईल.सर्व जिल्ह्यात राजकीय व विद्यार्थी संघटनाकडून यावल तालुका कार्यकारणी यांचे सर सर्वत्र अभिनंदन होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत