जळगाव जिल्ह्या हादरला आज 169 कोरोना बाधित
जिल्ह्या हादरला आज 169 कोरोना बाधित,सर्वत्र चित्ताजनक वातावरण झाला आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेलाच १६९ नवीन रूग्ण;
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज १६९ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यात जळगाव शहरातील संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबत अमळनेर, एरंडोल, जामनेर, बोदवड आदी तालुक्यांमध्येही संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण १६९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ५७ रुग्ण हे जळगाव शहरात आहे त्याच्या खालोखाल अमळनेर येथे १८; बोदवड-१६; एरंडोल व जामनेर- प्रत्येकी १४ रूग्ण आढळून आले आहेत.
अन्य ठिकाणांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-१२; भुसावळ-९; चोपडा-४; पाचोरा-१; भडगाव व धरणगाव- प्रत्येकी ३; यावल-८; रावेर-५; पारोळा-२ व मुक्ताईनगर १ अशी रूग्णसंख्या आहे. दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४१७६ इतका झालेला आहे. यातील २४७६ रूग्ण बरे झाले आहेत. तर आज ११ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या २६३ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.
लेवाजगत तर्फे सर्व जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे घरात रहा सुरक्षित रहा.
https://youtu.be/KCFcDw3syeM
सविस्तर बातमी वीडियो बघा
बातमीपत्र व नवनवीन माहिती पाहण्यासाठी वरिल⬆ लिंक वर क्लिक करा आणि अपडेट रहा...
⭕ दररोजच्या घडामोडी साठी आमचे चॅनल (lewajagat ) *subscribe* करा, *like*👍🏻 करा व *bell* 🔔वर क्लिक करून ताज्या अपडेट बघत रहा.
आता पहा संपूर्ण जगात कोठेही... फक्त एका क्लिक वर आणी रहा अपडेट *"saptahik lewajagat"* न्युज चॅनल तुमच्या 📱 मोबाईल वर थेट._
बातम्या व जाहीरातिसाठी संपर्क शाम पाटील मो. ९४२३१८९८४४,,८६६८४१३५०७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत