कोरोनावरील लस या वर्षी उपलब्ध होणे अशक्य
पुणे प्रतिनिधि
कोरोनाची लस उपलब्ध करण्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत मात्र या वर्षात कोरोनावरील लस उपलब्ध होणे शक्य नाही परिणामकारकता आणि सुरक्षितता यांची खातरजमा होईपर्यंत लस बाजारात आणण्याची घाई किमान आम्ही तरी करणार नाही अशी स्पष्ट माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावला यांनी मंगळवारी दिली.
मायलॅब डिस्कवरी सोल्युशन बरोबरच्या भागीदारीतून स्वयंचलित Rt-pcr चाचण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक उपकरणांचे अनावरन मंगळवारी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आले .यावेळी सीरमचे संस्थापक डॉक्टर सायरस पूनावाला अदर पूनावाला मायलॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल तसेच डॉक्टर शैलेंद्र कवाडे उपस्थित होते यावेळी आदर पूनावाला यांनी कोरोना प्रतिबंधक लस व भारतातील कोरोना तपासणी चाचण्यांची सघ्या:स्थिती याबाबत आपले विचार मांडले .
पूनावला म्हणाले जोपर्यंत करोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करणारी लस किंवा औषध सापडत नाही तोपर्यंत अधिकाधिक वैद्यकीय चाचण्या करणे हेच उद्दिष्ट असायला हवे देशातील सध्याच्या चाचण्यांची संख्या अत्यल्प असून आपण पुरेश्या चाचण्यांच्या जवळपासही अद्याप पोहोचलेले नाहीत कोणाची चाचणी करावी व कोणाची नाही याबाबत अद्यापही शासनाचे निर्बंध आहेत लक्षणें नसलेल्या व्यक्तीकडून संसर्ग पसरण्याचा मोठा धक्का आहे ही बाब विचारात घेऊन चाचण्याबाबतचे धोरण बदलण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत