चिनावलला एस टी मेकॅनिक सह दोन रुग्ण पॉझिटिव्ह
चिनावल प्रतिनिधी:- चिनावल तालुका रावेर गावात
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे नागरिक भयभीत झाल्याचे दिसतं आहे. रोज रुग्ण संख्या वाढत आहे आज आलेल्या अहवालात गावातील २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आल्याचे निष्पन्न झाले आहे.
आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात चिनावल गावातील एक ४२ एस टी मेकॅनिक व एक ५२ वर्षीय पुरुष रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. काल बुधवार रोजी चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले होते व आता पुन्हा दोन अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने गावात चिंता वाढत असून भीतीचे वातावरण आहे. सदरील सर्व रुग्ण चिंचवाडा परिसरातील रहिवासी आहे. त्यांच्या संपर्कातील १० व्यक्तींना कॉरटाइन करण्यात आले असुन सदरील वृत्ताने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. तर दिलासादायक असे की, काही रुग्ण कोरोनावर उपचार करून कोरोनावर मात करून घरी परत आहे.चिनवाल साठी येणार काळ हा खुप वाईट आहे, प्रशासना तर्फे सर्व नागरिकांना घरात रहा सुरक्षित राहा असे सांगण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत