चित्ताजनक:-जळगाव जिल्ह्यात १६९ रुग्ण पॉझिटिव्ह
जिल्ह्यात १६९ रुग्ण पॉझिटिव्ह
जळगाव ( प्रतिनिधी ) । आज दि १० रोजी सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात १६९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत . जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे . जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज दि १० रोजी जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल १६९ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . यात सर्वाधीक ७३ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत . याच्या खालोखाल जामनेर १० , मुक्ताईनगर ० , पारोळा ० , पाचोरा ४ , चाळीसगाव ४ , रावेर ८ , चोपडा १३ , बोदवड १ , जळगाव ग्रामीण १६ , भुसावळ १३ , भडगाव ४ , धरणगाव ६ , यावल ७ , एरंडोल १ , अमळनेर ९ , व अन्य जिल्ह्यातील १ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत . . आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ५४७१ इतका झालेला आहे . यातील ३२२३ रूग्ण बरे झाले आहेत . सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १९३३ रूग्ण उपचार घेत आहेत . आज ६ रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवर कोरोनाच्या बाधेमुळे मृत झालेल्यांची संख्या ३१५ इतकी झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे .
आजच्या पॉझिटिव्ह संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ५४७१ इतका झालेला आहे .यातील ३२२३ रूग्ण बरे झाले आहेत .सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १ ९ ३३ रूग्ण उपचार घेत आहेत .आज ६ रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवर कोरोनाच्या बाधेमुळे मृत झालेल्यांची संख्या ३१५ इतकी झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत