Contact Banner

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय-कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील हॉटेल-लॉज सुरू करण्यास परवानगी...

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय-कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील हॉटेल-लॉज सुरू करण्यास परवानगी...
 मुंबई प्रतिनिधी
कंटेन्मेंट झोन आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी हॉटेल्स सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

८ जुलैपासून  हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस अटी आणि शर्तीसह सुरू करता येणार आहेत.संपूर्ण क्षमतेपेक्षा ३३ टक्के क्षमतेने हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊसचा वापर करता येणार आहे असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील व्यवसाय, व्यापार, कंपन्या सुरू झाल्या होत्या मात्र, हॉटेल व्यवसाय बंदच होता.पण आता सरकारने हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्यास परवानगी दिली आहे.हॉटेल्स सुरू करण्याच्या संदर्भातील आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी काढले आहेत.सरकारने ही हॉटेल्स सुरू करण्याच्या संदर्भात अटी आणि शर्थी लागू केल्या आहेत.

सरकारने हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी कंटेन्मेंट झोनमध्ये हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉज सुरू करता येणार नाहीयेत.यासोबतच संपूर्ण क्षमतेपेक्षा केवळ ३३ टक्के ग्राहकांनाच आतमध्ये परवानगी देता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.