सावद्यात परत एक झटका एक पुरुष पॉझिटिव्ह मृत्यू,पॉझिटिव्ह संख्या झाली 49
सावद्यात परत एक झटका एक पुरुष पॉझिटिव्ह मृत्यू तर अजुन 4 पॉझिटिव
सावदा (प्रतिनिधी):- तीन दिवस पूर्वी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणी अहवालात सावदा शहरातील संशयित रूग्णांचे स्वाब पाच दिवसांपूर्वी तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्या रुग्णाचा मृत्यू दि ३० रोजी झाला असून हा व्यक्ती बुधवार पेठ परिसरातील गराडी बुवा चौक येथील रहिवासी असून त्याचे कुटुंबातील ४ व्यक्ती पण पॉझिटिव्ह आले आहे सदरील रूग्ण चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे दि ३० रोजी रात्री निष्पन्न झाले होते . आता शहरात एकुण ५० रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे,अशी माहिती मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दिली आहे. सदरील रुग्ण जळगाव येथे उल्हास पाटील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत होता रात्री उशिरा आलेल्या अहवाल अंती कोरोना बाधित या ६४ पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला . या रुग्ण बुधवार पेठ परिसरातील गराडी बुवा चौक येथील ६४ वर्षीय पुरुष 4 दिवस पूर्वी पॉझिटिव्ह होते. रुग्णांचा रहिवासी असलेला परिसर प्रशासनाकडून आधीच सील करण्यात आला असुन सदरील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे पॉझिटिव्ह अहवाल आले आहे. सदरील वृत्तास मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे. सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 49झाली असुन त्यात 8मयत, 11जणांवर उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला मात देत घरी परतले आहे.
Contentment zone 1ते 12 चा एकूण कोरोना सर्वेक्षण अहवाल एकूण कुटुंब---483, एकूण पुरुष---1012,एकूण स्त्रिया---926, एकूण लोकसंख्या--1938, 60 वर्षावरील लोकसंख्या--383,10 वर्षाखालील लोकसंख्या--192, आजारी असलेले---101,एकूण रूग्ण--49, मयत---8,बरे झालेले रूग्ण-- 30,उपचार सुरु असलेले--11

कोणत्याही टिप्पण्या नाहीत