निंबादेवी धरण पर्यटकांसाठी बंद
निंबादेवी धरण पर्यटकांसाठी बंद
परिसरात येणाऱ्यास १४ दिवस क्वारंन्टीन व ५०० रुपये दंड
भुसावळ प्रतिनिधि :- निंबा देवी धरण , सावखेडासीम , ता . यावल येथे रविवार भरपुर प्रमाणावर लोकांची गर्दी झालेली होती . निंबा देवी धरणावर होणाऱ्या या गर्दीमुळे कोरोना विषाणुचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता लक्षात घेता यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील निंबा देवी धरण येथे पर्यटकांची गर्दी होत असल्याने , गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निंबा देवी धरण व एक कि.मी. अंतरातील परिघाचे क्षेत्र ( Containment Area ) परिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात येत आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात (Containment Area ) पूर्णपणे संचारबंदी लागु राहील आणि सदर क्षेत्रात प्रवेश आणि निर्गमन करण्यास बंदी घालण्यात आली आहे त्याचप्रमाणे निंबा देवी धरणाच्या प्रतिबंधीत क्षेत्रात ( Containment Area ) मध्ये येणाऱ्या व्यक्तीवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा नुसार कायदेशिर कारवाई करण्यात व येणाऱ्या वाहनांवर वाहन अधिनियमाच्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात सदर क्षेत्रात जे व्यक्ती प्रवेश करतील त्यांना १४ दिवस संस्था विलगीकरण करण्यात व ५०० रुपये दंड नियुक्त पथकाने सदर क्षेत्रात प्रवेश करनारा कडून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालन करावे असे फैजपूर विभागाचे प्रांत अजित थोरबोले यांनी आदेश आज निर्गमित केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत