प्रशासनाचे प्रयत्न व नागरिकांचे सहकार्यामुळे कोरोना आटोक्यात,जिल्ह्यात १२८ कोरोना रुग्ण बाधित
प्रशासनाचे प्रयत्न व नागरिकांचे सहकार्यामुळे कोरोना आटोक्यात,जिल्ह्यात १२८ कोरोना रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): आज १६ ऑक्टोम्बर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ७.०० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात २३८ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ४८३५५ आहे . जिल्ह्यात सध्या २१०५ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात १२८ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५१६९७ झाली असून आज पर्यंत १२३७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज १२८ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील २४ आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ०१, भुसावळ १८, अमळनेर २२ , चोपडा ०१ ,पाचोरा ०६,भडगाव ०३
,धरणगाव ०३, यावल ०९, एरंडोल ००, जामनेर ०६, रावेर ०२ , पारोळा ०२ ,चाळीसगांव २१ , मुक्ताईनगर ०२, बोदवड ००६,इतर जिल्ह्यातील ०२ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत