Header Ads

Header ADS

माजी मंत्री खडसेंचा पक्ष प्रवेशाचा उद्याचा मुहूर्त विजया दशमी नंतर?


 


माजी मंत्री खडसेंचा पक्ष प्रवेशाचा उद्याचा मुहूर्त  विजया दशमी नंतर?

मुक्ताईनगर प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाची  चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे त्यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर बरोबर शिवसेनेच्या मंत्र्यांनी सुद्धा शिवसेनेत आपले स्वागत आहे अशी तयारी दर्शवली आहे. तरीपण संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू असताना उद्या घटस्थापनेला माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. त्याबद्दल त्यांनी मात्र आपला सस्पेन्स कायम ठेवला आहे चर्चा एवढि रंगली आहे की राष्ट्रवादी चे पदाधिकारी त्यांचे स्वागतही करून येत आहे. पक्ष प्रवेश करते वेळी ,खडसे यांच्या बरोबर मुलगी जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे, माजी आमदार तसेच काही पदाधिकारी  या भारतीय जनता पार्टी हा पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे चर्चा गेल्या चार दिवसापासून जोर धरू लागली आहे तर खासदार रक्षा खडसे ह्या भारतीय जनता पार्टी तच  राहतील अशी सुद्धा चर्चा रंगली आहे .

जिल्हात भारतीय जनता पक्षाचे वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात माजी मंत्री खडसे व रोहिणी खडसे यांनी सहभाग घेतला नाही या आधी झालेल्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असे पण मंदिर उघळण्याच्या  सरकार विरुद्धच्या आंदोलनात व जी एम हॉस्पिटलच्या उदघाटन समारंभास उपस्थिती नव्हती .

या कारणाने खडसे हे नक्की पक्ष सोडतील असे सर्व जिल्हाभरात या चर्चांना उधाण आले आहे.घटस्थापनेला पक्ष प्रवेश करणार असे असतानाच    उद्या घटस्थापना असून पक्ष प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम असून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा उद्या पक्ष प्रवेश होणार नसून प्रवेश विजयादशमीच्या मुहूर्तावर नंतर होईल असे सुद्धा चर्चा रंगत आहे .बघुया पुढे काय होते नाथाभाऊ हा  सस्पेन्स ही  लवकरच सोडतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.