रुग्ण संख्येत चढउतार:जळगाव जिल्ह्यात १४६ कोरोना रुग्ण बाधित
रुग्ण संख्येत चढउतार:जळगाव जिल्ह्यात १४६ कोरोना रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): आज १४ ऑक्टोम्बर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ६.३० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात २३६ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ४७८६२ आहे . जिल्ह्यात सध्या २३५५ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात १४६ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५१४५० झाली असून आज पर्यंत १२३३ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज १४६ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील ४२ आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ०३, भुसावळ ४१ , अमळनेर ०९ , चोपडा ०७,पाचोरा ०८,भडगाव ०५
,धरणगाव ०३, यावल ०३, एरंडोल ००, जामनेर ०५, रावेर ०१ , पारोळा ०१,चाळीसगांव ११ , मुक्ताईनगर ०३, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ०४ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत