Header Ads

Header ADS

बॅनर काढताना शॉक लागून युवकाचा मृत्यू

 


बॅनर काढताना शॉक लागून युवकाचा मृत्यू

भुसावळ प्रतिनिधी-शहरातील खडका चौफुलीजवळील मुस्कान हॉस्पिटल वर लावलेले जाहिरातीचे बॅनर काढताना विजतारांना स्पर्श होऊन २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. सविस्तर घटना अशी की गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजता ही घटना घडली आवेश अकील खान ,वय 23 वर्ष (राहणार 32 खोली रॉकेल डेपो जवळ भुसावळ )हा युवक गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास खडका चौफुलीजवळ असलेल्या  मुस्कान हॉस्पिटल वर लावलेले जाहिरातीचे बॅनर काढत होता. यादरम्यान बाजूला असलेल्या विजतारांना त्याचा स्पर्श झाला त्यामुळे शॉक लागून तो दगावला या घटनेची परिसरात माहिती कळताच घटनास्थळी गर्दी झाली बाजारपेठ  पोलीसांनी पंचनामा केला. डॉ तौसिफ  खान यांच्या खबरी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षण दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मिलिंद कंक व संदीप निकम तपास करत आहे दरम्यान आवेश चा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला तिथे शवविच्छेदन  करून भुसावळात अंत्यविधी झाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.