Header Ads

Header ADS

जामनेर येथे बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या पाचोरा डेपोच्या वाहकास पकडले

 


जामनेर येथे बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या पाचोरा डेपोच्या वाहकास पकडले

जामनेर प्रतिनिधी:- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या अमोल राजेंद्र देशमुख या पाचोरा डेपोच्या वाहकास एलसीबीच्या पथकाने गुरुवारी पाचोरा बसस्थानकावरून ताब्यात घेतले .त्याच्याजवळ आठ ते दहा मोबाईल आहेत. १३ ऑक्‍टोबरला देवेंद्र फडणवीस जामनेरात जीएम हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमादरम्यान बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फोन व मेसेज आमदार गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांना मोबाईल वर आला होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक कोटी रुपये न दिल्यास स्पोट घडवु असे मेसेज मध्ये म्हटले होते. 

   याप्रकरणी एलसीबी च्या पथकाने तपास केला असता कुऱ्हाड तालुका पाचोरा येथील मूळ रहिवासी व हल्ली पहूर येथील अमोल राजेंद्र देशमुख यांच्या मोबाईल वरून धमकी मिळाल्याची माहिती मिळाली. अमोल हा पाचोरा डेपोत वाहक असून बुधवारी तो पाचोरा- कल्याण बस घेऊन मुंबईला गेला होता. गुरुवारी सायंकाळी बस कल्याण वरून पाचोरा परतली त्यानंतर बस ताब्यात घेण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.