Header Ads

Header ADS

ज्ञानदीप विद्यालयात ऑनलाईन "वाचन प्रेरणा दिन"साजरा

 


ज्ञानदीप विद्यालयात ऑनलाईन "वाचन प्रेरणा दिन"साजरा

पारोळा प्रतिनिधी- येथील ज्ञानदीप बहुउद्देशीय विद्याप्रसारक मंडळ संचलित, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे डाँ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन"  ऑनलाइन साजरा करण्यात आला .सदरप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य कमलेश देवरे यांनी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

      विद्यालयातील इयत्ता  ५ वी ते १२ वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर गुगल मीट ऐप द्वारे लिंक पाठवून विद्यार्थ्यांना ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी करून घेतले.तसेच विद्यालयातील शिक्षक भरत पाटील यांनी डाँ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रा विषयी सखोल माहिती आपल्या मनोगतातुन दिली, त्याचप्रमाणे बहुसंख्य विद्यार्थ्यांनिही कार्यक्रमात सहभाग नोंदवला व मनोगत व्यक्त केले,योगेश बोरसे,देविदास पाटील,विनोद पाटील उपस्थित होते

   सदरप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राहुल बाविस्कर व आभार किशोर पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.