चढउतार :जळगाव जिल्ह्यात ११९ कोरोना रुग्ण बाधित
चढउतार :जळगाव जिल्ह्यात ११९ कोरोना रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): आज १५ ऑक्टोम्बर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ६.०० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात २५५ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ४८११७ आहे . जिल्ह्यात सध्या २२१७ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ११९ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५१५६९ झाली असून आज पर्यंत १२३५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ११९ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील ४१ आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ०२, भुसावळ ०६, अमळनेर ०४ , चोपडा ०३ ,पाचोरा ०६,भडगाव ०७
,धरणगाव ०३, यावल १७, एरंडोल ०, जामनेर ०७, रावेर ०५ , पारोळा ०० ,चाळीसगांव १४ , मुक्ताईनगर ०२, बोदवड ०१,इतर जिल्ह्यातील ०१ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत