विडिओ-श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत घटस्थापना
श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत घटस्थापना
पहिली माळ, रंग राखाळी
प्रतिनिधी । यावल -सातपुडा निवासनी आई श्री मनुदेवी मंदिरात शनीवारी शास्त्राेक्त पध्दतीने घटस्थापना करण्यात आली. कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाच्या सुचनांचे पालक करून या ठिकाणी मोजक्याच नागरीकांच्या उपस्थितीत काकड आरती व नंतर घटस्थापना करण्यात आली संपुर्ण नऊ दिवस येथे मंदिराचे पुजारी व संस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुजा- अर्चा कार्यक्रम घेतले जाणार आहे.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमी राज्य शासनाने मंदिर उघडण्याची परवानगी न दिल्याने सातपुडा निवासिनी आई मनुदेवीच्या मंदिरात प्रथमचं भक्त, भाविकांच्या अनुउपस्थिती शास्त्रोक्त व धार्मिक पध्दतीने घटस्थापना करण्यात आली सकाळी नऊ वाजेला संस्थानचे संचालक नितिन भास्कर पाटील व सौ मिना नितिन पाटील या दाम्पत्याच्या हस्ते घटस्थापना पार पडली. सकाळी मंदिर संस्थानाच्या वतीने या ठिकाणी सजावट करण्यात आली व रोशनाई करीत काकड आरती पार पडली तर नऊ वाजेला पारंपारिक पध्दतीने घटस्थापना करण्यात आली इतिहासात प्रथमचं मंदिरात भाविकांची गर्दी नसतांना, घटस्थापना पार पडली तर ऐरवी नवरात्राेत्सवात येथे दररोज राज्या सह शेजारील राज्यातील लाखों भाविक या तिर्थ क्षेत्रावर येत असतं सातपुड्याची वनराईत यंदा मात्र, कोराेना विषाणुच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र शांतता दिसत आहे व मंदिरात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या प्रसंगी येथे मंदिर संस्थानाचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव निळकंठ चौधरी, साेपान वाणी, नितीन पाटील, सतिष पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विश्वदिप पाटील सह आदिंची उपस्थिती होती.
पहिली माळ, रंग राखाळी.
नवरात्रोत्सवातील आजची महिली माळ असुन रंग राखाळी आहे तेव्हा आई मनुदेवीला राखाळी रंगाची साडी नेसवण्यात आली आहे सकाळी काकड आरती नंतर घटस्थापना पार पडली दैनदिनी येथे पुजा अर्चा नियमित सुरू राहणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत