सावद्यात तलवार बाळगणाऱ्या तरुणास अटक
सावद्यात तलवार बाळगणाऱ्या तरुणास अटक
सावदा प्रतिनिधी -दिनांक १५ रोजी रात्री ९ वाजून ३० वाजता सावदा शहरात सावदा ते फैजपुर रोडवर लेंडी नाल्याजवळ इसम नामे छट्टू शेखलाल गवळी वय २९ (राहणार शिरपूर कन्हाळा तालुका भुसावळ हा त्याचे कब्जात गैरकायदा २००० रुपये किमतीची एक लोखंडी तलवार बाळगत असताना मिळून आला म्हणून सावदा पोलीस स्टेशन येथे आर्म एक्ट ०४/२५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक बापू रोहम स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलिस अधिकारी मुक्ताईनगर भाग, सपोनि वानखेडे ,सावदा पोस्टे पीएसआय आर डी पवार, ऐ एस आय राजेंद्र पाटील, पोहेकॉ रवी नरवाडे,अनिल इंगळे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा संजीव चौधरी,देवेंद्र पाटील, विशाल खैरनार सावदा पोस्टे यांनी संयुक्तरीत्या केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत