Contact Banner

एक दिवसाच्या अर्भकाला शेतात टाकून महिला पसार

 

 एक दिवसाच्या अर्भकाला शेतात टाकून महिला पसार.

यावल प्रतिनिधी- तालुक्यातील डांभुर्णी शिवारात जळगाव धानोरा रस्त्यावर अज्ञात महिलेने एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक रस्त्याच्या कडेला शेतात टाकून दिले ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. मजुरांच्या सतर्कतेमुळे या बाळाला यावल ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथून अर्भकाला जळगावला नेले आहे.

       रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारात नितीन फालक यांच्या गट क्रमांक ७८५ मधील शेतात हे अर्भक आढळले .दुपारी लाल रंगाची साडी परिधान केलेली महिला व पुरुष दुचाकीने त्या ठिकाणी आले होते ,त्यांनी शेताच्या बांधावर बाळालासोडून पळ काढला. हा प्रकार शेतमजूर इंदुबाई कोळी, पीक संरक्षण सोसायटीचे रखवालदार देविदास साळुंखे यांनी पहिला त्यांनी डाभुर्णीचे पोलीस पाटील किरण कचरे यांना माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने अर्भकाला यावल ग्रामीण रुग्णालयात आणले वैद्यकीय अधिकारी डॉबी  बी बारेला,अधिपरिचारिका नीलिमा पाटील,वाय डी चौधरी यांनी उपचार केले संगोपनाच्या दृष्टीने बाळाला  जळगाव हलवण्यात आले या प्रकरणी पोलीस पाटील किरण कचरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल झाला पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार तपास करत आहेत.

1 divsachya arbhakala shetat takun mahila pasar, dabhurni shivaratil ghatna

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.