Contact Banner

विक्रेत्याच्या दक्षतेने तळला रेल्वेचा अपघात

 

विक्रेत्याच्या दक्षतेने तळला रेल्वेचा अपघात

पाटलीपुत्रचा अपघात टळला ;भुसावळ येथील घटना

भुसावळ प्रतिनिधि:- रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक सात वर रविवारी सकाळी 6.25 वाजता एलटीटी-पाटलीपुत्र एक्सप्रेसचे आगमन झाले.  थांब्याची वेळ संपल्यानंतर गाडी पुढे जाण्यासाठी निघाली त्यावेळी रुळ तुटण्याचा मोठा आवाज आला. त्यामुळे विक्रेत्यांनी आरडाओरड करत लोकोपायलट ला माहिती दिली त्यामुळे तत्काळ थांबविण्यात आल्याने मोठा अपघात टळला गाडी प्लॅटफॉर्मवरून पुढे जात असताना तिचा वेग कमी होता. अचानक मोठा आवाज झाल्याने खाद्यपदार्थ विक्रेता शेख नईम शेख इक्बाल, सरफराज मेहमुद शेख व इम्रान पठाण यांनी धाव घेऊन लोको पायलटला माहिती दिली तसेच रेल्वे रुळाला तडा गेल्याने तत्काळ गाडी थांबवण्यात आली लोको पायलेटांनी पाहणी केल्यावर हा प्रकार समोर आला. सी एन डब्ल्यू विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुळाची दुरुस्ती केली. जागेवरच गाडी थांबल्याने पुढील धोका टळला; पण यामुळे गाडीला तब्बल 50 मिनिटे विलंब झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.