Contact Banner

21 लाखाची 500 ब्रास जप्त केलेली वाळु लंपास

 

 

21 लाखाची 500 ब्रास जप्त केलेली वाळु लंपास

प्रतिनिधी निंभोरा:- तालुक्यातील निंभोरा येथील महसूल विभागाने 10 नोव्हेंबरला सुमारे 21 लाख रुपयांचा 500 ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला होता. मात्र महसूल विभागाच्या निष्काळजीपणामुळे लीलाव होण्यापूर्वीच संपूर्ण वाळू साठा तस्करांनी लंपास केल्याचे मंगळवारी समोर आले. शासनाने दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. गौणखनिज तस्करी रोखणे व दंड वसूल करणे देखील त्याचाच एक भाग आहे. रावेर तालुक्यात तापी,सुखी व भोकर या नद्यांच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा रात्रंदिवस सुरू आहे. अशा प्रकारे अवैधपणे उपसा केलेली वाळू तस्करांनी निंभोरा येथील दत्त मंदिरा मागील भागात तसेच बोर्डी-निंभोरा शिव रस्त्यावर असा दोन ठिकाणी साठवले होती. 500 ब्रास वाळूचा हा साठा 10 नोव्हेंबरला महसूल विभागाच्या निर्देश आल्याने तो जप्त केला होता. वाळू जप्त केल्यावर तात्काळ लिलाव प्रक्रिया करणे गरजेचे होते. मात्र तब्बल पंचवीस दिवस विलंबाने 4 डिसेंबरला लिलाव प्रक्रियेबाबत महसूल प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयासह पत्रव्यवहार केला. याचे अद्याप उत्तर मिळालेले नाही.

●  नेमके दोषी कोण

 महसूल विभागाने जप्त केलेल्या वाळूसाठ्याच पंचनामा करून तो निंबोरासीम येथील पोलीस पाटलांच्या ताब्यात दिला होता अशी माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली जप्त वाळूसाठ्याच्या लिलाव करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्रव्यवहार करण्यास विलंब का केला? संबंधित मंडळाअधिकारी व तलाठी यांनी जप्त वाळूसाठ्याची काळजी का घेतली नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.