Contact Banner

पारोळा येथे अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती

 


पारोळा येथे अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती

  पारोळा प्रतिनिधी-अल्पवयीन 16 वर्षीय तरुणीवर मद्याच्या नशेत आरोपीने अत्याचार केल्याने ही अल्पयीन तरुणी सहा महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यात घडली. या प्रकरणी पारोळा तालुक्यातील रहिवासी रवींद्र शामराव पाटील या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील एका गावात पीडीता आई-भावासह राहते. कुटुंबासह सदस्य बाहेरगावी गेल्यानंतर एका दिवशी रात्री 11 वाजता आरोपी मद्याच्या नशेत अत्याचार केला व दुसर्‍या दिवशी पुन्हा मद्याच्या नशेत दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास पुन्हा येवून मारहाण व शिवीगाळ करून पुन्हा अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पीडीतेच्या आईला संशय आल्याने धुळे येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात तपासणी केली असता पीडीता सहा महिन्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आईने विश्वासात घेवून मुलीची विचारपूस केली असता संशयीत आरोपी रवींद्र पाटील यानेच अत्याचार केल्याचे उघड झाले. पीडीीतेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.आरोपीस न्यायालयात हजर केले असता 26 पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

https://www.lewajagat.com/2020/12/4%20varshachya%20chimuklivar%20baltkar%20karun%20pishavit%20bharun%20fekle%20rstyavar.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.