Contact Banner

जळगाव जिल्ह्यात आज ५७ कोरोना रुग्ण बाधित

 


 जळगाव जिल्ह्यात आज ५७ कोरोना रुग्ण बाधित


(जळगाव प्रतिनिधी): आज २३ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार  रात्री ६.४० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार . 

           जिल्ह्यात आज दिवसभरात ३१ रूग्ण उपचारात   बरे  होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत  उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३७५२ आहे . जिल्ह्यात सध्या ३८७ रूग्ण उपचार घेत असून  आज दिवसभरात ५७ नवीन  बाधित रूग्ण आढळल्याने  एकूण बाधितांची संख्या ५५४५८ झाली असून आज  पर्यंत १३१९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . 


जळगांव शहर शंभराच्या आत:-

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या   माहिती  नुसार जिल्ह्यात आज ५७ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात  जळगाव शहरातील  १४ आहेत. 


असे आढळले रुग्ण:-


तालुका निहाय बाधित रुग्णाची  आकडेवारी  जळगांव ग्रामिण ०५, भुसावळ ०८, अमळनेर ०६, चोपडा ०३,पाचोरा ००, भडगाव  ००,धरणगाव ००, यावल ०१ , एरंडोल ०१, जामनेर ००, रावेर ०८,पारोळा ०५,चाळीसगांव ०३, मुक्ताईनगर ००, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ०३असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.