आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन च्या पश्चिम विभाग उपाध्यक्षपदी समाजसेवक डॉ रवींद्र भोळे यांची नियुक्ती
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन च्या पश्चिम विभाग उपाध्यक्षपदी समाजसेवक डॉ रवींद्र भोळे यांची नियुक्ती
उरुळी कांचन प्रतिनिधी :ए आय एम ए आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या पश्चिम विभाग च्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे .आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोशियन चे उपाध्यक्ष डॉक्टर नितीनजी पाटील यांनी नियुक्ती केली आहे. आयुष इंटरनॅशनल असोसिएशन या सहा पॅथी घेऊन कार्य करीत आहेत .या सहापथ्यी मध्ये समन्वयक निर्माण होणे ,विविध रिसर्च होणे, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थेचे कार्य वाढविणे ,विविध सेमिनार घेणे ,यासाठी ही नियुक्ती आहे .ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉक्टर रवींद्रभोळे यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेलेआहे. कोरोना महामारी च्या कालावधीमध्ये पंधरामार्चते आतापर्यंत एक एकही दिवस सुट्टी न घेता अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा दिलेली आहे .त्याच प्रमाणे कोरोना महामारी च्या कालावधीमध्ये कोरोना पंडेमिक covid-19 समुपदेशनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे .प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्त्वानुसार जनतेला मार्गदर्शन केलेले आहेत. covid-19 च्या भयग्रस्त व भीतीग्रस्त वातावरणात 24 तास वैद्यकीय सेवा दिलेली आहे .त्याचप्रमाणे होमेपेथीक अर्सेनिक थर्टी चे मोफत वाटप रुग्णांना केले आहे. डॉरवींद्र भोळे यांनी पस्तीस वर्षे राज्यांमध्ये सामाजिक ,धार्मिक ,वैद्यकीय ,अपंग सेवा ,व्यसनमुक्ती ,नैसर्गिक आपत्ती मदत ,संस्थात्मक कार्य, मतिमंद मूकबधिर सेवा ,वृक्षारोपण, राष्ट्रीय सेवा योजना, एड्स निर्मूलन ,कुष्ठरोग दुरीकरण मोहीम ,पल्स पोलिओ मोहिम, एन सी डीकॅम्प, फ्लु कॅम्प, नेत्ररोग तपासणी, हृदयरोग तपासणी शिबिरे ,आरोग्य तपासणी शिबिर, युरिनरी कॅम्प ,हृदय रोग यांना आर्थिक मदत मिळवून देणे, कुपोषण मोहीम, कुष्ठरोग दुरीकरण मोहीम ,नेहरू युवा केंद्रातर्फे हे विविध उपक्रम राबवले आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील दहा हजार स्वयंसेवकांना मॅगसेसे अवॉर्ड विजेते पद्मश्री डॉक्टर मनिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन गौरव केला आहे .शांतिसेना निर्माण केलेले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रभक्तीची ज्योत निर्माण होण्यासाठी ,तेवत ठेवण्यासाठी ,निष्काम कर्मयोगी कार्यकर्त्यांना भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय रत्न पुरस्कार ,भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम रत्न पुरस्कार, यासारखे पुरस्कार देऊन राष्ट्रप्रेम निर्माण केलेले आहे. डॉरवींद्र भोळे राज्यातील समाजसेवेचे मॉडेल आहे .जनतेच्या भल्यासाठी अविरत कार्य करणारे डॉक्टर रवींद्र भोळे हे शांती सेनेचे पुरस्कर्ते व सामाजिक न्यायाचे ऊर्जा स्तोत्र आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पाच विद्यमान खासदारांनी भारत सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी शिफारस पत्र दिले आहे .इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या व्यतिरिक्त डॉक्टर रवींद्र भोळे वारकरी मंच महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय विभागाचे अध्यक्षआहेत. राज्यातील 30 ते 40 अपंग संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. डॉ रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र चालवून गोरगरीब रुग्णांना ते अत्यल्प दरात धर्मदाय नियमानुसार वैद्यकीय सेवा देत आहे . या वैद्यकीय सेवेसाठी ते कोणाची आर्थिक मदत घेत नाही तसेच संस्थेला कोणतेही एटी जी लायसन नाही. मराठवाडा भूकंप , गुजरात भूकंप आणि अन्नधान्य गोळा करणे , उरळीकांचन गॅस्ट्रो साथ, महिला सबलीकरण , ग्रामीण विकास , या क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले आहे . पद्मश्री डॉक्टर मनिभाई देसाई प्रतिष्ठान नेहरू युवा केंद्र क्रीडा मंत्रालय भारत सरकार संलग्नित व मनिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट निती आयोग संलग्नित आय एस ओ नामांकने मिळालेल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. एकंदरीत राज्यांमध्ये शांती सेनेचा पुरस्कार डॉक्टर भोळे यांनी केला आहे. ते राज्यातील एक समाजसेवेचे मॉडेल आहे. आशा डॉक्टरांची आयुष इंटरनॅशनल असोशियन च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर रवींद्र भोळे यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत