Contact Banner

भारतीय समुद्रात विविध देशांच्या 120 युद्धनौका

 

भारतीय समुद्रात विविध देशांच्या 120 युद्धनौका

नवी दिल्ली:- भारतीय समुद्रात विविध देशांच्या 120 युद्धनौका सध्या वेगवेगळ्या मोहिमांसाठी तैनात करण्यात आलेले आहेत. भारतासोबत धोरणात्मक सागरी संबंध मजबूत करण्यावर अनेक देशभर देत असल्याचेही ते संकेत आहे. असे प्रतिपादन तिन्ही सशस्त्र दलाच्या सेनापती (सीडीएस)जनरल बीपिन रावत यांनी केले

      जागतिक सुरक्षा परिषदेला आभासी माध्यमातून संबोधित  करताना रावत बोलत होते. अनेक देशांना भारतासोबत चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत त्यामुळे भारतीय समुद्रात या देशांनी विविध प्रकारच्या मोहिमांसाठी आपल्या युद्धनौका पाठवले आहेत बदली तील भौगोलिक स्थिती आणि काही देशांकडून निर्माण होत असलेला धोका, या पृष्ठभूमीवर या देशांसोबतचे वाढते संबंध भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

   इतक्या मोठ्या प्रमाणात युद्धनौका तैनात असतानाही या भागात शांतता आहे. यातील बहुतांश उपखंडातील नसतानाही तणाव निर्माण होणार नाही, याची ते काळजी घेत आहेत असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे भारतासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या भागात मागील काही महिन्यापासून चीन आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे जगातील एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू झालेली आहे. आमच्या शेजारील देश राष्ट्रीय सुरक्षेला सातत्याने धोका निर्माण करीत असताना देखील आम्ही ते उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करू असे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.