Contact Banner

दुचाकीच्या धडकेत तीन वारकरी जखमी

 


दुचाकीच्या धडकेत तीन वारकरी जखमी

मुक्ताईनगर येथील घटना

मुक्ताईनगर प्रतिनिधि:- एकादशीनिमित्त संत मुक्ताई चे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दुचाकीची धडक बसल्याने ते जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली एकादशीनिमित्त श्री संत मुक्ताईच्या दर्शनासाठी तालुक्यातील लोहारखेडा येथील वारकरी अशोक सोनू पाटील, बळीराम वामन पाटील, राजाराम पाटील हे जुने मुक्ताई मंदिरातून नागेश्वर मंदिर मार्गे कोथळीतील मुक्ताई मंदिराकडे पायी जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या दुचाकीने या तिघांना धडक दिल्याने ते फेकले जाऊन जखमी झाले. या प्रकरणी किरण पाटील लोहारखेडा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार सादीक पटवे करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.