Contact Banner

देशासह राज्यात अवकाळी पाऊस;गारपीटीचीही शक्यता

 


देशासह राज्यात अवकाळी पाऊस;गारपीटीचीही शक्यता

जळगाव प्रतिनिधि:-

जळगाव संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात येत्या चार दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात वातावरण ढगाळ झाले आहे, शुक्रवारी रात्रीपासून वातावरण ढगाळ झाले आहे. उत्तरेतील राज्यांमध्ये देखील गेल्या दोन दिवसात वातावरणात बदल झाला असून काही ठिकाणी पाऊस देखील होत आहे. राज्यात जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी तुरळक पावसाने हजेरी लावली हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 15 डिसेंबर पर्यंत वातावरण ढगाळ असेल याकाळात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रावर कापसाच्या गाड्या उभ्या केल्या आहेत पाऊस आल्यास हा कापूस होण्याची शक्यता आहे. दरम्यान शुक्रवारी नंदुरबार,धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली, राज्यातही अनेक भागात पावसाचा शिडकावा झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.