Contact Banner

जिथे पहिला रुग्ण, तिथूनच आली लस

 



जिथे पहिला रुग्ण, तिथूनच आली लस

समस्या तिथे उपाय

वृत्त सेवा:-

दुबई सहलीवरून पुण्यात परतलेल्या एका ग्रुपमध्ये नऊ मार्चला पहिला कोरोना रुग्ण आढळला आणि राज्याचे प्रशासन खडबडून जागे झाले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू झाल्या. त्यातच 22 मार्चला देशभरात लॉकडाऊन लागू झाला आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. परंतु, या दरम्यानच्या काळात जगभरात विविध लसींचा पुरवठा करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्रोझेनेका कंपनीच्या सहकार्याने कोरोनावरील लसीचे संशोधन सुरू केले. तिला 'कोविशील्ड’असे नाव देण्यात आले. अविरत  संशोधनातून तयार झालेल्या या लसीची तीन टप्प्यांत चाचणी करण्यात आली. मानवी चाचणीही यशस्वी ठरल्याने तिचे उत्पादन सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 नोव्हेंबरला ‛सिरम’ ला भेट देऊन लस निर्मितीची पाहणी केली. नव्या वर्षाच्या सुरुवातीला ही लस आरोग्य सेवातील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने नागरिकांना ती दिली जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.