धुळ्यात अधिकारी पती-पत्नी विरुद्ध असंपदेचा गुन्हा;मुंबईत असताना जमवली 42 लाखांची असंपदा
धुळ्यात अधिकारी पती-पत्नी विरुद्ध असंपदेचा गुन्हा;मुंबईत असताना जमवली 42 लाखांची असंपदा
धुळे प्रतिनिधि:-
सुमारे 42 लाखांची अपसंपदा बाळगल्याप्रकरणी मुंबई मंत्रालयातील माजी कक्ष अधिकारी राजेंद्र कुमार गावित व त्यांच्या पत्नी तथा तत्कालीन पोलिस निरीक्षक इला गावित यांच्याविरुद्ध सोमवारी धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील रहिवासी असलेले राजेंद्र कुमार कृष्णराव गावित हे 1 जानेवारी 2005 ते 31 डिसेंबर 2013 दरम्यान मुंबई मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी इला गावित या पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. मुंबईत कार्यरत असताना राजेंद्र गावित यांनी अपसंपदा कमावली. याबाबत सात वर्षापूर्वी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करत होते. या चौकशी दरम्यान सन 2005 ते 2013 पर्यंतच्या गावित यांच्या अर्जित शासकीय संपदा व खर्च यांचे चौकशी व ताळमेळ घालण्यात आला. त्यातून गावित यांच्याकडे आपल्या उत्पन्नापेक्षा 42 लाख 49 हजार 340 रुपयांची अपसंपदा मिळून आली.तर त्यांच्या पत्नी ईला गावित यांनी अपसंपदा आपल्या नावे करून सहकार्य केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुऱ्हाडे यांच्या तक्रारीवरून धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
●तीन अधिकाऱ्यांची खांदेपालट
या काळात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपआधीक्ष शिवाजी बुधवंत हे होते. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली यानंतर उपाधीक्षक शत्रुघ्न वाडी यांनी व सध्या कार्यरत असलेले उपाध्यक्ष सुनील कुऱ्हाडे यांनी प्रकरणाची चौकशी करून तक्रार दाखल केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत