Contact Banner

लंडनहून पुण्यात आलेल्या रुग्णामध्ये लक्षण असण्याची शक्यता ; नायडू हॉस्पिटलमध्ये शिफ्ट , कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू


 लंडनहून पुण्यात आलेल्या रुग्णामध्ये लक्षण असण्याची शक्यता ; नायडू हॉस्पिटलमध्ये शिफ्ट , कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू 

पुण्यात २५ नोव्हेंबरपासून सुमारे ५४४ लोक ब्रिटनमधून आले आहेत 

वृत्त संस्था- पुण्यात एका कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीमध्ये कोरोनाचा

ब्रिटनमधून आले आहेत . पुण्यात एका कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीमध्ये कोरोनाचा ब्रिटेनमधील स्ट्रेन आढळण्याची शक्यता आहे . ही व्यक्ती ११ दिवसांपूर्वी लंडनमधून पुण्यात आली होती . यानंतर त्याला शहरातील नायडू रुग्णालयातील एका स्पेशल वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले . सध्या तो असिम्प्टोमॅटिक ( विना लक्षण ) आहे . नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी ( NIV ) त्यांच्या इतर टेस्ट करत आहेत . या संपूर्ण टेस्टमध्ये दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो . जिल्हा प्रशासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू केले आहे . पुण्यात २५ नोव्हेंबरपासून सुमारे ५४४ लोक ब्रिटनमधून आले आहेत . सर्वांचा मागोवा घेण्यात येत आहे . महाराष्ट्र एपिडेमिओलॉजी सेलचे प्रमुख डॉ . प्रदीप अवाटे म्हणाले की , २५नोव्हेंबरपासून ब्रिटनमधील ३ हजार लोकांची महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने यादी केली आहे . यापैकी ११६ जणांना ट्रॅक करण्यात आले असून ५२ची आरटी - पीसीआर चाचणी घेण्यात आली आहे . 

     डॉ . आवटे यांनी सांगितले की ,नागपुरात नवीन स्ट्रेन आल्याच्या संशयावरून अॅडमिट व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे . दरम्यान , बृहन्मुंबई महानगरपालिकेला यूके ते मुंबईकडे प्रवास करणाऱ्या १,५००प्रवाशांची यादी मिळाली आहे . प्रत्येकाला चाचणी करण्यास सांगितले जात आहे . प्रत्येकाची चाचणी शनिवारपासून सुरू केली जाईल . राज्यात आतापर्यंत ९४.५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ३१७१नवीन संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत . यासह राज्यात एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १८,०४,८७१ झाली आहे . आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची एकूण टक्केवारी ९४.५ आहे . राज्यात अद्याप ५४८९१रूग्णांवर उपचार सुरू आहेत . गेल्या २४ तासांत राज्यात ३५८० नवीन रुग्ण आढळले आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.