Contact Banner

एकनाथराव खडसेंना कोरोना लक्षण, आज ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता कमी

 


माजी मंत्री एकनाथराव खडसे आज  ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता कमी 

 मुंबई वृत्त सेवा-माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने ते आज दिनांक ३० रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर आली आहे . 

   न्यूज -१८ लोकमत या वाहिनीने एकनाथराव खडसे हे उद्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे वृत्त दिले आहे . यानुसार माजी मंत्री  एकनाथराव खडसे यांना मिळालेल्या नोटीसमध्ये त्यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आलेले आहे . यानुसार खडसे हे मुंबई येथे दाखल झालेले आहेत . तथापि , ते आज चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे . एकनाथराव खडसे यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे . यामुळे ते आज  हजर राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे असे न्यूज -१८ लोकमत वाहिनीच्या वृत्तात म्हटले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.