भाजप खासदार वसावा यांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी
भाजप खासदार वसावा यांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी
वृत्तसंस्था अहमदाबाद:- स्टील गुजरातमध्ये भरुचचे भाजप लोकसभा सदस्य मनसुख वसावा यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे, ते म्हणाले पुढील लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेच्या सदस्यत्वाचा ही राजीनामा देऊ प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांना पाठवलेल्या पत्रात या निर्णयाबद्दल माहिती देण्यात आली मनसुख यांनी सोडचिठ्ठी का दिली याचे कारण गुलदस्त्यात आहे. पक्ष व जीवनाचे सिद्धांत यांचे पालन करताना खूप दक्षता घेतली, परंतु मी एक माणूस आहे माणसाकडून चूक होते. म्हणून पक्षाचा राजीनामा देतो. असे त्यांनी पत्रात म्हटले अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना पत्र पाठवले होते. मात्र त्यांनी गुजरात मध्ये आदिवासी महिलांची तस्करी होत असल्याबद्दल सरकारवर आरोप केला होता. स्टॅच्यू ऑफ युनिटी बाबत त्यांनी याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी परिसराला सेन्सिटिव्ह झोन (पर्यावरणासाठी संवेदनशील क्षेत्र) रद्द करण्याची देखील मागणी केली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत