माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोना चौकशी साठी ईडी ने दिली १४ दिवसाची मुदत
माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोना चौकशीसाठी ईडी ने दिली १४ दिवसाची मुदत
मुक्ताईनगर प्रतिनिधी:- माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा कोरणा चाचणीचा अहवाल बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
पुणे येथील भोसरी भूखंड प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्याने ३० डिसेंबरला हजर व्हायचे होते. परंतु खडसेंना कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्यांनी ईडी कडे पुढील १४ दिवसांची मुदत मागितली होती त्यास ईडीने संमती दिली आहे .दरम्यान २८ डिसेंबर रोजी खडसेंना ताप सर्दी व कोरड्या खोकल्याचा त्रास जाणवू लागला होता .त्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झाला .त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भोसरी भूखंड प्रकरणी ही नोटीस आहे या आधीही चार वेळा चौकशी झाली आहे ही पाचवी आहे. त्यांना जे सहकार्य लागणार ते मी केले आहे आता देखील सहकार्य करील १४ दिवसांनंतर हजर होणेबाबत ईडी ने मला संमती दिलेली आहे असे खडसे यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत