Contact Banner

नागपूर येथील सहायक कामगार आयुक्ताला 60 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

 

नागपूर येथील सहायक कामगार आयुक्ताला 60 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले.ही घटना लातूर येथील नाही.

कागदपत्रातील त्रुटीची पूर्तता त्यासाठी मालकाला मागितले होते पैसे

प्रतिनिधि नागपुर:- कंपनीचे इन्स्पेक्शन आणि कामगार सुरक्षेच्या मुद्यावरून साठ हजार रुपयांची लाच घेताना सीबीआय' लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केंद्रीय सहाय्यक कामगार आयुक्त सचिन शेलार याला अटक केली आहे. तक्रार कर त्याच्या कंपनीत केंद्रीय कामगार आयुक्तांच्या चमूने या 13 डिसेंबर रोजी तपासणी केली असता कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या पूर्ण केल्यानंतर तक्रार दाराला लेबर लायसन्स मिळणार होते. तक्रार करता कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात गेले असता,त्यांना घरी भेटण्यास सांगितले, तक्रार करता घरी भेटला असता त्याच्याकडे लचेची  मागणी करण्यात आली. लाच द्यायची नसल्याने तक्रारदार त्याने 18 डिसेंबर रोजी सीबीआय,एसीबी कडे तक्रार केली. तपासात स्पष्ट झाल्याने सापळा रचण्यात आला. त्यात सहायक कामगार आयुक्त शेलार याला लाच घेताना अटक करण्यात आली. दरम्यान याप्रकरणी आणखी तपास करण्यात येत असल्याचे सुत्रांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.