Contact Banner

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड ला दरमहिन्याला 1.5 लाख मिळणार

 

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड ला दरमहिन्याला 1.5 लाख मिळणार

इस्लामाबाद वृत्त सेवा-:- मुंबई हल्ल्याचा मुख्य आरोपी लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या जकिर रहमान लखवीला पाकिस्तान सरकार दर महिन्याला दीड लाख रुपये देणार आहे.इम्रान खान सरकारच्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंधित समितीने मंजुरी दिली आहे. 2008 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लखविचा हात असल्याचे समोर आले होते.

      परिषदेने त्याला निर्बंध असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले होते. या अहवालानुसार लखवीला दर महिन्याला भोजन खर्चापोटी 50000 औषधी 45000 वकिलाची फी व इतर खर्च प्रत्येकी 20000 आहेत. प्रवासासाठी 15000 दिले जातील.

मुंबई हल्ल्यातील आरोपी व तुरुंगात कैद असलेल्या झकीऊर रहेमानला पाकिस्तान सरकारने एप्रिल 2015 मध्ये मुक्त केले होते. तेव्हा पाकिस्तानने लखवीच्या विरोधात ठोस पुरावा नसल्याचा युक्तिवाद केला होता. रावळपिंडीच्या अड़ीयाला तुरुंगातून सुटका झाल्यानंतर लखवी अनेक दिवस अंडरग्राउंड होता. परंतु दहशतवादी करावया सुरूच ठेवल्या होत्या लखवी जमात-उद दावाचा म्होरख्या हाफिज सईदचा तो साथीदार होता. संघटनेत तो दुसऱ्या क्रमांकावर होता मुंबई हल्ल्यात पकडलेला अफजल कसाब, डेव्हिड हेडली अबु जूंदाल यांनी चौकशी दरम्यान लखवीच्या नावाचा उल्लेख होता. तो हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांच्या संपर्कात होतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.