महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावेत
महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावेत.
धुळे प्रतिनिधि:- जिल्ह्यातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टल वर सादर करावेत, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकन्वये कळवले आहे. सर्व शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित ,व्यवसायिक,अव्यवसायिक महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती, विमुक्त जाती ,भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 2020- 2021 या वर्षातील तसेच 2019 ते 2020 चे त्रुटीयुक्त अर्ज पुन्हा सादर करणे,7 महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मागे पाठविलेले अर्ज महाडीबीटी प्रणालीवर सादर करण्या कामी भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क ,राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यवसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेचे अर्ज करण्यासाठी महाडीबीटी ही संगणक प्रणाली 3 डिसेंबर पासून कार्यरत झालेली आहे. संबंधित विद्यालयाचे प्राचार्य विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे व शिक्षण शुल्क ,परीक्षा शुल्क या योजनेचे अर्ज तत्काळ भरावेत. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पडताळणी करून या कार्यालयात विहित वेळेत ऑनलाइन सादर करावेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत