Contact Banner

बनावट नोटा सावदा परिसरात चलनात

 

बनावट नोटा सावदा परिसरात चलनात

प्रतिनिधी मोठा वाघोदा -रावेर तालुक्यातील सावदा ,मोठा वाघोदा,चिनावल, कोचूर, खिरोदा परिसरात शंभर व दोनशेच्या बनावटी नोटा चलनात आल्या आहेत. बाजारात गर्दीच्या ठिकाणी किंवा ग्राहकांची वर्दळ असलेल्या दुकानांवर या नोटा चालवण्यात आल्या आहेत, अशी माहिती संबंधित दुकानदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

   हुबेहूब दिसणाऱ्या या नोटा गेल्या पंधरादिवसा पासून व्यवहारात आल्या आहेत.  या बनावटी नकली नोटा चालवणाऱ्यांचे  रॅकेट तालुक्यात परिसरात कार्यरत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व , दुकानदारांना नुकसान सहन करावे लागत आहे. पोलिस प्रशासन तत्काळ दखल घेऊन, या रॅकेट भांडाफोड करावा, तसेच प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढावी, अशी अपेक्षा नागरिक व्यापारी या मधून  व्यक्त केली जात आहे.

संदर्भ:-दिव्यमराठी

Savda prisarat banavt 100.200chya nota chalnat

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.