Contact Banner

नव्या वर्षात मिळणार स्मार्ट रेशन कार्ड

 


नव्या वर्षात मिळणार स्मार्ट रेशन कार्ड

वृत्त सेवा:- आता रेशन कार्ड एटीएम सारखा होणार असून एक "नेशन एक रेशन कार्ड" योजनेअंतर्गत नव्या वर्षात नव्या रूपात एटीएम कार्ड दिसणार आहे. केंद्र सरकारने रेशन कार्ड मध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. सरकारकडून सुमारे 84 कोटी नागरिकांना आता स्मार्ट रेशन कार्ड दिले जाणार आहे,त्याची सुरुवात बिहारमधून होईल रेशन कार्ड योजनेचा फायदा देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला असून तुमच्या रेशन कार्ड आता देशातील कुठल्याही राज्यात चालेल.त्यामुळे नोकरीसाठी अन्य राज्यात गेलेल्या नागरिकांना विस्थापित झालेल्या मजुरांना या योजनेचा लाभ मिळेल. आतापर्यंत देशातील 28 राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये या योजनेचा लाभ मिळवण्यास सुरुवात झाली आहे.


"वन नेशन वन रेशन" कार्डचे फायदे:- या योजनेअंतर्गत सध्या जुन्या कार्डवर धान्य मिळेल.तुम्ही ज्या राज्यात आहात तिथे तुमच्या जवळील रेशन दुकानदारांकडून जाऊन रेशन कार्ड बनवू शकतात. तिथे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज देखील करता येऊ शकतो.


योजनेचा फायदा कसा मिळवाल:- रेशन कार्ड नसेल तर आधार कार्ड लिंक करूनही रेशनचा लाभ मिळवू शकता. त्यासाठी बीपीएल कार्ड असणे गरजेच आहे. त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल रेशन कार्ड बनवण्यासाठी प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पोर्टल आहेत. त्यावर बीपीएल कार्डधारक रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळालेली पोचपावती तहसील कार्यालयात अन्नपुरवठा अधिकाऱ्यांकडे द्यावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.