Contact Banner

"वसईचा राजाचा" अभिनव उपक्रम थेलसेमीयाग्रस्तांना मिळणार आधार


 "वसईचा राजाचा" अभिनव उपक्रम थेलसेमीयाग्रस्तांना मिळणार आधार


ठाणे,दिपेश पष्टे - कोरोना प्रादुर्भाव काळात थेलसेमीयाग्रस्तांची होणारी रक्ताची गरज पाहता "वसईचा राजा" चे अध्यक्ष निलेश भानुशे , मानद सचिव राहूलजी भांडारकर यांच्या संकल्पनेतून थेलसेमिया रुग्णांना रक्त पुरवठा करण्याची गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे ठरले आहे.

        रक्तदान महोत्सवाचा पाया रचणारे वसईचा राजा चे निलेश भानुशे यांनी सदर रक्तदान शिबीरा अंतर्गत जमा झालेले रक्तसाठा थेलसेमिया ग्रस्त रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करुन देण्याचे ठरवले असुन मंडळाच्या निर्णयाचे स्वागत विविध स्तरातून होत आहे. २० डिसेंबर रोजी वसई विरार मधील रक्तदात्यांनी दाखविलेल्या रक्तदान महोत्सवास उदंड प्रतिसाद मिळाला व याचा फायदा गरजू थेलसेमिया ग्रस्त रुग्णांसाठी होईल अशी तजवीज होईल असे योगेश भानुशे व चिन्मय गावणकर यांनी आश्वासित केले. तशा प्रकारचे निवेदन डी एम पेटीट रुग्णालय च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांना दिले. आमची वसई चे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी वविमनपाला केलेल्या "थेलसेमिया केअर सेंटर" च्या मागणीचा पुरवठा "वसईचा राजा"  तर्फे करण्यात येईल अशी ग्वाही राहूलजी भांडारकर व राहूल पाटील यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.