Contact Banner

बेवफा कौन? एक प्रेमिका दोन प्रियकर प्रेमाच्या त्रिकोणाचा वाद पोलीस ठाण्यात.

 

बेवफा कौन? एक प्रेमिका दोन प्रियकर प्रेमाच्या त्रिकोणाचा वाद पोलीस ठाण्यात.

रावेर , प्रतिनिधी -बेवफा कौन ? ... एक प्रेमीका तर दोन प्रियकरांच्या अजब प्रेमत्रिकोणाचा निवाडा करण्याचे काम रावेर पोलिसांवर येऊन पडल्याने त्यांची डोकेदुखीत वाढली असून त्यांनी तूर्त मध्यममार्ग काढून प्रकरण मिटविले आहे .

स्टेशनला आला असता या तिघांमध्ये बेवफा कौन शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसां समोर होत . याची दिवसभर पोलिस ठाण्याच्या आवारात चर्चा होती . बाजिराव - मस्तानी या चित्रपटातील किसकी तलवार पर सर रखू ये बता दो मुझे..इश्क करना खता है ... तो सजा दो मुझे..ही शायरी उस्मानाबादच्या युवतीवर परफेक्ट बसतेय . आताचे मूल - मूली प्रेमासाठी काहीपण करायला तयार आहे . याचा प्रत्यय रावेर पोलिसांनी आज अनुभवला . 

   सविस्तर वृत्त असे की, उमरगा ( जि.उस्मानाबाद ) येथील २० वर्षीय टीवायबीएचे शिक्षण झालेली युवती औरंगाबादच्या एका कंपनीत जॉब करत होती ... जॉब करता - करता .. या युवतीचे तिच्या सोबतच जॉब करणारा आणि मुळचा औरंगाबादचा असणाऱ्या एका २२ वर्षीय युवका सोबत प्रेम संबध जुळले . अश्यातच रावेर तालुक्यातील एका खेड्यामधील २३ वर्षीय युवक टिक - टॉकवर व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करायचा . ह्या युवकाचे व्हिडिओ आवडू लागल्याने ती त्याच्या प्रेमात पडली . यातून तिला आधीचा प्रियकर नकोसा वाटू लागला . तीने टिक - टॉक स्टारशी मोबाईलवर बोलणे सुरु केले . या बोलण्याचे प्रेमात रुपांतर होऊन दोघांनी  बुऱ्हानपुर ( मध्य प्रदेश ) येथे लग्न केले . त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाहीत तोच तिला आपल्या पहिल्या प्रियकराची आठवण येऊ लागल्याने तिने त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधला . यातून त्यांचे प्रेम पुन्हा बहरले . पहिला प्रियकर तिला घेऊन जाण्यासाठी थेट रावेर तालुक्यातील तिच्या गावी येऊन धडकला . यातच तो मागील चार दिवसापासून प्रेयसीच्या गावाच्या घिरट्या घालत असून रात्री उड्डाणपूलावर झोप घेत आहे . तिच्या नवऱ्याला संशय आल्याने दोघांचे बिंग फुटले . प्रकरण पोलिसात गेल्यावर ती तरुणी आपल्या पहिल्या प्रेमासोबत जाण्यावर ठाम आहे तर तिचा नवरा आपण तुला कोणाच्या जबाबदारी सोडू असा प्रश्न उपस्थित करत आहे . यातून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे . यातून मध्यममार्ग काढत पोलिसांनी त्या तरुणीला नवऱ्याकडे राहण्याचा सल्ला देत तरुणीच्या आई - वडिलांना बोलवून घेतले आहे . आता तरुणीचे आई - वडील आल्यावरच हा प्रेमाचा त्रिकोण सुटणार आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.