Contact Banner

यावल शहरात बिबट्याचे दर्शन रहिवाशांमध्ये भीती

 


यावल शहरात बिबट्याचे दर्शन रहिवाशांमध्ये भीती  . Yawal shahrat bibtyache shukravari darshan

यावल प्रतिनिधी तालुक्यातील निमगाव शिवारातील दिसलेल्या बिबट्याचे आता आपला मोर्चा यावल शहराकडे वळवला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बिबट्या शहरातील मानवी वस्ती बोरावलगेट परिसरात दिसला. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली .याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली अनेक ठिकाणी बिबट्याचे पगमार्ग दिसले.

     गेल्या काही दिवसापासून यावल शहर परिसरात निमगाव शेती शिवारात बिबट्याचा वावर आहे आता शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा बिबट्या यावल शहरातील  मानवी वस्तीकडे दिसल्याचे खळबळ उडाली. शहरातील बोरावल गेट  भागात हा बिबट्या  घोड्याच्या तबेल्या  जवळ आला होता त्यावेळी घोडा जोराने खिकळल्याने आजूबाजूच्या नागरिकांना जाग आली  मग त्यांनी भांडे वाजवत व आरडाओरडा केली. त्यामुळे बिबट्या तेथून बोरावल  रस्त्याकडे पळ काढला मानवी वस्तीत बिबट्या दिसल्याने शहरातील नागरिकांची झोप उडाली .याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली असून त्यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.