वर्षभरापासून बंद असलेल्या २१ वाळू गटांचे लिलाव होणार
वर्षभरापासून बंद असलेल्या २१ वाळू गटांचे लिलाव होणार
प्रतिनिधी:-जळगाव जिल्ह्यातील वाळू गटांचा लिलाव होण्याचा मार्ग मोकळा झाला असून , २१ गटांच्या लिलावाला राज्याच्या पर्यावरण समितीने मान्यता दिली आहे . ३० सप्टेंबर २०१ ९ पासून वर्षभर बंद असलेल्या वाळू गटांचा लिलाव होणार असल्याचे काहीअंशी अवैध वाळू उपसा बंद होऊन शासनाला महसूल मिळणार आहे . जिल्ह्यातील ४३ वाळू गटांच्या लिलावासाठी पर्यावरण समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता . १ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असल्याने १६ वाळू गट समितीकडून लिलावासाठी रद्द करण्यात आले होते . २७ वाळू गट मान्य करण्यात आले . त्यामध्येही त्रुटी काढण्यात आल्या होत्या . त्या त्रुटींची पूर्तता करण्यात आलेली आहे . गेल्या वर्षी करण्यात आलेल्या १३ वाळू गटांच्या लिलावाची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपलेली होती . त्यानंतर वर्षभर वाळू गटांचा लिलाव झालेला नाही . लिलाव झालेला नसतानाही अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरूच होती . जिल्ह्यातील काही तालुक्यातील नदीपात्र वाळू उपशासाठी प्रतिबंधित करण्यात आले होते . त्याचा फारसा उपयोग झाला नाही . वाहतुकीसाठी दुसऱ्या जिल्ह्यातील बनावट पावत्या वापरण्यात आल्या . बंदी असूनही वर्षभरापासून उपद्रव सुरूच आहे . गेल्या वर्षी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या २ ९ ३ डंपर्स , ट्रॅक्टर मालकांकडून २ कोटी ४६ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल ही केला . सर्वाधिक उपद्रव असलेल्या जळगाव तालुक्यात ५० लाखांचा दंड वसूल करण्यात आला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत