Contact Banner

यावलचा फरार आरोपी सावदा पोलीसांच्या जाळ्यात


यावलचा फरार आरोपी सावदा पोलीसांच्या जाळ्यात
 

सावदा प्रतिनिधी-आज दि .२५ / १२ / २०२० रोजी सायंकाळी सावदा शहरात इसम नामे- सलीम सिकंदर तडवी , रा.परसाडे ता.यावल हा बसस्थानक परीसरात सार्वजनिक ठिकाणी काही एक कारण नसतांना मोठ मोठ्याने आरडा ओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असतांना मिळुन आल्याने त्यास सावदा पोलीसांनी ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणले व त्याचेवर मुं.पो.का.क .११२ / ११७ प्रमाणे कारवाई केली , सदर आरोपी कडेस सखोल विचारपुस करता तो यावल पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या भाग -५ गुरन १५ ९ / २०२० भादवि कलम -४२० प्रमाणे दाखल अपराधातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीतास यावल पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे . सदरची कारवाई ही सपोनि उणवने  यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि . आर डी पवार , पोहेका . सपकाळे , पोना रिजवान पिंजारी , पोना .संजीव चौधरी , पोना .सुरेश अढायगे , पोका . विशाल खैरनार यांनी केली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.