जळगाव जिल्ह्यात आज ४२ कोरोना रुग्ण बाधित
जळगाव जिल्ह्यात आज ४२ कोरोना रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): आज १९ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ६.४० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात ४५ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३६६५ आहे . जिल्ह्यात सध्या ३५४ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ४२ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५५३२८ झाली असून आज पर्यंत १३१७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ४२ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील २४ आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ००, भुसावळ ०९, अमळनेर ००, चोपडा ००,पाचोरा ०१ , भडगाव ०१,धरणगाव ०२, यावल ०० , एरंडोल ००, जामनेर ००, रावेर ०१,पारोळा ०२,चाळीसगांव ०१, मुक्ताईनगर ०१, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ००असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत