Contact Banner

७ गावठी कट्यासह सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल चोपड्यात जप्त


 ७ गावठी कट्यासह सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल चोपड्यात जप्त

चोपडा प्रतिनिधी- चोपडा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना बसमधून गावठी कट्ट्यांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचत चुंचाळे ता. चोपडा येथील बस स्टँडवर बलवाडी-चोपडा बस क्रमांक एम एच ४० एन ९०६४ मधून प्रवास करणाऱ्या दोघा संशयीतांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून तब्बल सात गावठी कट्टे जप्त केलेले आहेत. दीपक विजय वर्मा (वय ३६, हेंगवाल खुर्द, ता.लुधियाना, पंजाब) व बलजितसिंग सारगनसिंग सरदार (वय २८, बस्ती बाजीगड, अहियापूर उरमर, हुशियारपूर, पंजाब) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यात २,१०,००० रू किंमतीचे ७ गावठी कट्टे ,१७,००० रू किंमतीचे मोबाईल आणि १५३०रूपयांची रोकड असा एकूण रक्कम २,२८,५३०रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.या दोघा आरोपीं विरूध्द चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.