अभया हत्येप्रकरणी फादर कॅथॉलिक आणि नन दोषी
अभया हत्येप्रकरणी फादर कॅथॉलिक आणि नन दोषी
वृत्त संस्था-केरळमधील बहुचर्चित सिस्टर अभया हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयाने कॅथॉलिक फादर आणि एका ननला मंगळवारी दोषी ठरवले . सिस्टर अभयाचा ( २१ ) मृतदेह १९९२ मध्ये कोट्टायमच्या सेंट पीयूस कॉन्व्हेंट शाळेच्या विहिरीत आढळला होता . या प्रकरणात २८ वर्षांनी निकाल लागला . विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जे . सनल कुमार यांनी दोन्ही आरोपी फादर थॉमस कोट्टर आणि सिस्टर सेफीला दोषी ठरवले आहे . दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत . बुधवारी शिक्षेची सुनावणी होईल , या प्रकरणातील दुसरे आरोपी फादर पुथराकयाल यांना आधीच पुराव्याअभावी मुक्त करण्यात आले आहे . ते अभयाच्या महाविद्यालयातील सहविद्यार्थी होते . अभयाच्या आई - वडिलांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता . आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला . मार्च १९९२ मध्ये विहिरीत अभयाचा मृतदेह आढळला होता . फिर्यादीनुसार अभयावर कु - हाडीच्या दांड्याने हल्ला करण्यात आला होता . ती काही अनैतिक कारवायांची साक्षीदार होती , ज्यात तीनही आरोपींचा सहभाग होता . २००८ मध्ये सीबीआयने हे प्रकरण आपल्या हातात घेतले .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत