कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये; तेथून दोन आठवड्यात आलेत सात हजार जण भारतात
कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये; तेथून दोन आठवड्यात आलेत सात हजार जण भारतात
वृत्तसेवा:-ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या रूपाने संपूर्ण जग चिंतेत असतानाच राज्यात रात्री महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात संचारबंदी आणि ब्रिटन मधून येणाऱ्या विमानांना उद्यापासून बंदी केंद्र सरकारने घातले असली , तरी मागील आठवड्यात 7 हजार जण ब्रिटनमधून दिल्लीत आले आहेत . ही माहिती सरकारला मिळाल्याने सरकार आता खडबडून जागे झाले असून , या सर्वांच्या घरी सरकारची आरोग्य यंत्रणा माहिती घेणार आहे . मात्र यामुळे सामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . काल दिल्लीत आलेल्या विमानामधील पाच जण कोरोनाचे रुग्ण आढळल्याने व या नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण आढळलेल्या भागातून ते आले असल्याने चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे . मात्र यापेक्षाही मागील दोन आठवड्यात पंजाब आणि दिल्ली येथील सात हजार जण ब्रिटन होऊन माघारी आले आहेत . त्यांनी या दरम्यानच्या काळात प्रवासही केलेला आहे . त्यामुळे सरकार अधिक सतर्क झाले आहे आणि त्यापेक्षाही या कोरोनाच्या नव्या रुपाचे रुग्ण नव्याने वाढूनन त्याचा संसर्ग अधिक फैलावू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे . मात्र यावेळी देखील विमानांना बंदी झाल्यास उशीर झाला , अशाच प्रतिक्रिया आता येऊ लागल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत